वृद्धाश्रमाच्या खोट्या नावाने देणगी मागणाऱ्या दांपत्याचा शिवभक्तांकडून पर्दाफाश

Kolhapur news
By -

 


              

             
             


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


मुरगुडच्या सरपिराजीराव रोडवर सकाळच्या वेळी एक गाडी स्पीकर वरून वृद्धाश्रमाला मदत करा असे आवाहन करत फिरत होती. यामध्ये एक महिला हातामध्ये कन्नड अक्षरे असलेले फाईल घेऊन घरोघरी जुने कपडे धान्य मागत होती .त्याचा संशय आल्यामुळे शिवभक्त सर्जेराव भाट आणि ओंकार पोतदार यांनी त्यांना अडवून त्यांच्याकडे असलेल्या परवाना, संस्थेची कागदपत्रे यांची चौकशी केली . यावेळी त्यांनी उडवाउडविची उत्तर दिली. तसेच आम्हाला मराठी भाषा येत नाही , त्यामुळे तुम्ही कन्नड मध्ये बोला अशी धमकी देण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या साथीदाराला फोन लावून त्याच्याशी बोलण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला .त्यांचा हा डाव शिवभक्तांनी उलटवून लावला .पोलिसांची भीती दाखवल्यानंतर त्यांनी आपल्याकडे परवाना असल्याचे तसेच आम्ही फक्त कर्नाटक भागातच मागू शकतो असे सांगितले . त्यावर संतप्त झालेल्या शिवभक्तांनी कर्नाटकामध्ये परत फिरा,असे सांगितले. पुन्हा असे प्रकार केल्यास पोलिसांच्या ताब्यात  देऊ,असे देखील सांगितले , यावर त्यांनी मुरगुड मधून काढता पाय घेतला.


 गावोगावी अशा प्रकारचे स्पीकर लावून मदत करा म्हणून सांगणारे तसेच हातामध्ये फाईल घेऊन फिरणारे आणि व्यक्ती असतात त्यांची सजग राहून चौकशी करणे गरजेचे आहे , अन्यथा अशी लोकं आपल्याला फसवून गेलेले समजणार नाहीत . लोकांच्या भाबडेपणाचा आणि भोळेपणाचा फायदा घेऊन हे लोक अशा प्रकारे वर्गणी जमा करतात , असे प्रकार वाढत आहेत. शिवभक्तांनी वेळीच  समयसूचकता दाखवत त्यांना अडवले अन्यथा अनेक जण त्यांच्या फसवणुकीला बळी पडले असते शिवभक्तांच्या या सजग वृत्तीचे परिसरात कौतुक होत आहे. 


         -------------------------------------------