कुस्तीमध्ये महाराष्ट्र राज्याला स्वाती शिंदेच्या रूपाने एकमेव ५३ किलो वजन गटात सुवर्णपदक

Kolhapur news
By -

 

             


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


38 व्या नॅशनल गेम्स कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची व

लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय SAI कुस्ती संकुल ची मल्ल स्वाती संजय शिंदे हिने 53 किलो वजन गटात प्रेक्षणीय कुस्त्या करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला स्वातीने आक्रमक खेळी करत कविताला कलाजंग, दुहेरी पट व भारंदाज या डावांचा उपयोग करत स्वातीने 10 -00 अशा गुण फरकाने कविताला पराभूत करून कॉटर फायनल मध्ये प्रवेश केला .


स्वाती महाराष्ट्र विरुद्ध संतोषी चंदिगड 

स्वातीने संतोषीला एकेरी पट या डावाचा वापर करून ताबा मिळवत भारंदाज डाव मारून संतोषीला चितपट करून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला .


स्वाती महाराष्ट्र विरुद्ध ज्योती हरियाणा  आंतरराष्ट्रीय पदक विजेती

या तुल्यबळ कुस्तीमध्ये तीन मिनिटाच्या पहिल्या फेरीत पॅसिविटी वरती ज्योतीला 1 गुण मिळवता आला स्वातीचा गुणफलक 0 असा होता 

तर दुसऱ्या तीन मिनिटाच्या फेरीमध्ये स्वातीने पॅसिविटी वरती 2 गुण मिळवल्या नंतर पुन्हा स्वातीने धोबी हा डाव मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाल्यामुळे ज्योतीने स्वाती वरती कब्जा केला आणि पुन्हा 2 गुणांची कमाई केली. दुसऱ्या फेरीतील शेवटचे 25 सेकंद राहिले असताना स्वातीचा गुणफलक 02 व ज्योतीचा गुणफलक 03 असा होता 

करो या मरो अशी स्थिती असताना स्वातीने ज्योती वर साईट थ्रो या धोकादायक डावाचा वापर करत 4 गुणांची कमाई करून स्वातीचे एकूण गुण 06 असा झाला परंतु ज्योतीच्या प्रशिक्षकांना दिलेले गुण मान्य नसल्याने त्यांनी चॅलेंज चा वापर केला पण त्यांचे चॅलेंज सक्सेस न झाल्यामुळे स्वातीला पुन्हा एकदा 1 गुण मिळाला व स्वातीचा गुणफलक 07 व ज्योतीचा गुणफलक 03 राहिला दुसऱ्या फेरीची तीन मिनिट समाप्त झाली व स्वातीने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला 


स्वाती शिंदे महाराष्ट्र विरुद्ध पूजा जाट मध्य प्रदेश आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर सुवर्णपदकाच्या या तुल्यबळ लढतीत पहिल्या तीन मिनिटाच्या फेरीमध्ये स्वातीने  पॅसिविटी चा ०१ गुण मिळवून आघाडीवर होती . 

तसेच दुसऱ्या फेरीमध्ये पूजाला पॅसिविटीचा ०१ गुण मिळाला अटीतटीची कुस्ती सुरू असताना स्वातीने एकेरी पटाचा प्रयोग करून पूजावरती ताबा मिळवत ०२ गुण संपादन केले व स्वाती भारंदाज डावाचा उपयोग करत असताना पूजा ही धोकादायक स्थितीमध्ये सापडली असताना स्वातीने कंटिन्यू धोकादायक ( डेंजर ) स्थितीत जवळजवळ दोन  मिनिट तसेच रोखून ठेवत असताना स्वातीचा गुणफलक ०५ व पूजाचा गुणफलक ०१ राहिला व सुवर्णपदकाच्या दुसऱ्या तीन मिनिटाच्या फेरीतील टाईम समाप्त झाला व स्वातीने सुवर्णपदकाला  गवसणी घातली.


      -------------------------------------------