स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून जे उपकार केलेत, त्याची भरपाई करणे अशक्यच - अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे

Kolhapur news
By -

 

          



     

     


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


 आपल्या कार्याच्या  माध्यमातून  स्व. सदाशिवराव मंडलिकांनी जे उपकार केले आहेत, त्याची भरपाई करणे अशक्यच आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.


स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या १० व्या स्मृतीदिनी कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 


निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे म्हणाले , आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी दूधगंगेचे पाणी वेदगंगेत टाकणे, चिकोत्राची उभारणी, शिक्षण संस्थांचे निर्माण केलेले जाळे, सहकाराचे लावलेले रोपटे यातून शाश्वत कामे केली आहेत. 


   माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले स्वर्गीय मंडलिक हे जरी आज नसले तरी त्यांचा विचार हा शाश्वत असणार आहे. त्यांची ध्येयधोरणे पुढे नेताना त्यांचे स्मारक असणारा कारखाना ऊस पुरवठ्याच्या दृष्टीने परिपूर्ण झाला पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्व ऊस तिकडे पुरवला पाहिजे . पुढे शेतकरी व कारखाना कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेतल्या जातील. 


 १० व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास  जिल्हा मुद्रांक अधिकारी बाबासाहेब वाघमोडे प्रमुख उपस्थितीत होते.यावेळी प्रमुख मान्यवरांसह उपाध्यक्ष आनंदराव फराकटे, युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ॲड.वीरेंद्र मंडलिक, आर. डी. पाटील-कुरुकलीकर, एम. आर. चौगुले, के. डी. शिंदे, भगवान पाटील,विश्वास कुराडे, मारुतीराव काळूगडे,अविनाश चौगुले ,  सुधीर पाटोळे ,के डी गोसावी ,काकासाे चौगुले , प्रशांत गुरव , रघुनाथ शिरसे,  तानाजी सातपुते यांच्यासह सर्व संचालक, साहेबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

     




            -----------------------------