निपाणी : पेठवडगाव येथून कर्नाटक मध्ये कत्तलीसाठी दहा बैल घेवून जाणार आहेत, अशी माहिती गोरक्षण सेवा समितीला मिळताच गोरक्षकांच्याकडून बैल घेऊन जाणारी गाडी पकडण्यात आली. याप्रकरणी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत गोरक्षण सेवा समितीचे सागर श्रीखंडे यांनी सांगितले की, कागल पोलीस यांच्या मदतीने वाहन चालकाची चौकशी केली असता वाहन चालकांच्याकडून उडवाउडवीची उत्तर मिळाल्याने 112 नंबर हेल्पलाईनला कॉल करून आयशर वाहन पोलिसांच्या स्वाधीन केले. गोवंशाची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी वाहन प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत जप्त केले. ताब्यात घेतलेले सर्व गोवंश निपाणीतील समाधी मठाच्या गोशाळेत दाखल केले. यावेळी गोसेवा समिती निपाणी , कागल येथील गोरक्षकांचे मोठ्या संख्येने गोवंश वाचवण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. याबाबत कागल पोलीस स्थानकात गाडी चालक दुर्गेश शंकर जाधव रा. संत रोहिदासनगर पेठनाका वाळवा, इस्लामपूर-सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कागल पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षिका करीत आहे
यावेळी मानद पशुकल्यान अधिकारी साईनाथ जाधव यांचे विशेष सहकार्य मिळाले .यावेळी अखिल भारत कृषी गोसेवा खानापूर येथील गोरक्षक साईनाथ जाधव, महेश बाबर, अतुल जाधव, पोपट जाधव, निलेश जाधव, शिवम निकम, मकरंद पेडणेकर, गोरक्षण सेवा समिती चे कागल येथील ओंकार त्रिगुणे, समरजीत जाधव, कोगनोळी येथील सागर कळेकर, नितीन परिट यांनी ही कारवाई करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
------------------------------------

