एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणाऱ्या शिवसैनिकांना थाेपवण्यासाठी ठाकरे शिवसेनेने शोधून काढला पर्याय

Kolhapur news
By -

 

                     


    मुंबई :  विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेनेचे झालेले पानिपत, मुंबईतील निम्म्या नगरसेवकांनी पक्षाला ठोकलेला रामराम तसेच राज्यभरात कमी-अधिक अशीच परिस्थिती असल्यामुळे आता कडवट शिवसैनिकांना थोपवण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हुबेहूब आवाजामधील भाषणे दाखवली जाणार आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून काही दुर्मिळ जुनी भाषणे व त्याचा चालू राजकीय परिस्थितीशी असलेला संबंध जोडून शिवसैनिकांना चेतवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 


बाळासाहेबांची काही जुनी आणि दुर्मिळ भाषणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सद्यःस्थितीवर भाष्य करताना शिबिरादरम्यान दाखवली जातील. शिवसेनाप्रमुखच मार्गदर्शन करत आहेत, असेच  वाटणार आहे. 


      विधानसभा निवडणुकीत पक्षाने सपाटून मार खाल्ला. सत्ता गेल्याने ठाकरेंचे निष्ठावंतही आता एकापाठोपाठ एक शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जात आहेत. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेला पुन्हा भरारी घेण्यासाठी आता बाळासाहेबांच्या आवाजाचा प्रयोग केला जाणार आहे.

 

------------------------------------