कोल्हापूर न्यूज नेटवर्क
राजस्थान मध्ये कोटा येथे सुरू असलेल्या वीस वर्षाखालील (कनिष्ठ) राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मुरगूड येथील गौरी मधुकर पाटील ने रौप्य पदक पटकावले.
गौरी ही लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलाची (SAI) मल्ल आहे.कनिष्ठ गटातील ५० किलो वजन गटात तिने हे पदक मिळविले आहे.
गौरीच्या या यशाचे सविस्तर वर्णन...
पहिली कुस्ती
गौरीने पहिल्या कुस्तीमध्ये मध्यप्रदेशच्या मुस्कानला पराभूत केले
दुसरी कुस्ती
गौरीने दुसऱ्या कुस्तीमध्ये आंध्रप्रदेशच्या नेहाला पराभूत करत सेमी फायनल मध्ये प्रवेश केला
सेमी फायनल कुस्ती
गौरी विरुद्ध श्वेता कर्नाटक
या अटीतटीच्या कुस्तीमध्ये गौरीपेक्षा अनुभवाने वरचढ असणाऱ्या श्वेताला गौरीने एकेरी पट ,भारंदाज ही टेक्निक करून 06-02 अशा गुण फरकाने श्वेताला पराभूत करत अंतिम फेरीमध्ये गौरीने प्रवेश केला
अंतिम फेरी -फायनल
गौरी विरुद्ध वनिता हरियाणा आंतरराष्ट्रीय पदक विजेती
या तुल्यबळ लढतीत सुरुवातीलाच आक्रमण करत गौरीने 04 गुणांची कमाई केली परंतु नंतर वनिताने गौरी वरती 06 गुण मिळवत दोन गुणांची आघाडी ठेवत सुवर्णपदकाची मानकरी ठरली व गौरीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
परंतु गौरीचे कुस्ती कारकीर्दीतील हे कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील पहिलेच पदक in असून निश्चितच तिला या रौप्य पदकामुळे भारतीय कुस्ती संघाच्या सराव शिबिरासाठी निवड झालेली आहे यामुळे शिबिरामध्ये होणाऱ्या जागतिक ,आशियाई कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी तिची निवड झालेली आहे
-----------------------------------