मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. वारंवार होणाऱ्या पराभवामुळे राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी करण्यापेक्षा जनतेत जाऊन त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणालेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी तिथे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची मुदत संपल्यानंतर सायंकाळी 5.30 ते 7.30 पर्यंत तब्बल 65 लाख मतदारांनी मतदान केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे भारतात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
----------------------------