कोल्हापूर न्यूज / वि. रा. भोसले
पाक व्याप्त काश्मीर म्हणजे भारतमातेच्या कपाळावरचा मोठा घाव आहे.अश्वथामाच्या जखमेसारखा तो वहात राहिला आहे.
भारतमातेवर प्रेम करणाऱ्या कोट्यावधी देशवासीयांचे स्वप्न आहे.
पाकव्यात काश्मीर मुक्त करा.
हीच वेळ आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याची.
खायला अन्न नाही.प्यायचे पाणी सुद्धा आता बंद होईल.तरीही पी ओ के मधील अतिरेक्यांच्या कारवाया थांबणार नाहीत.तेथेच त्यांचे अड्डे आहेत.सर्जिकल स्ट्राईक म्हणजे म्हणजे फक्त एक मलम पट्टी झाली.
विकृत वृत्तीच्या चार पोरांच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्यांनी २६ निरपराध,निशस्त्र पर्यटकांचे बळी घेतले. त्या जीवांची कांहीच कदर नाही ?
त्यांच्या आत्म्यांना शांती मिळायची असेल तर त्या अतिरेकी पोरांच्या आकांना पाताळात गाडले पाहिजे.
त्या पोरांना अत्याधुनिक बंदुका कोणी पुरवल्या ?
त्यांच्या मस्तकात धर्म द्वेषाचे विष कोणी पसरवले?
भारतीय जवानांनी त्या चार पोरांच्या चिंधड्या उडवल्या असल्या तरी दहशतवादाचे भूत आपल्या देशाच्या मानगुटीवरुन उतरणार नाही.
९३ हजार पाकिस्तानी सैनिकांना शरणागती पत्करायला लावून भारतीय जवानांनी १९७१ ला बांगला देशचा लचका तोडला होता.ही मर्दुमकी देश विसरलेला नाही.आज तर आपली ताकद कित्येक पटींनी वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय जनमत सुद्धा भारताच्या बाजूने आहे.अमेरिका ,इस्राएल,रशिया,युरोप यांनी दहशतवादावर निर्णायक घाव घातलेले आहेत.या सर्व देशांनी पाकिस्तानला आरोपीच्या पिंजऱ्यात कोंडले आहे .हीच संधी आहे पी ओ के ला भारतात सामील करून घेण्याची.
बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान यांनी सुद्धा पाकिस्तानच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
पिसाळलेल्या प्राण्याला सगळ्यांनी ढोसावे तशी अवस्था पाकिस्तानची झाली आहे.
पाकिस्तानचा बारीक डोळ्यांचा दोस्त सुद्धा दहशत वादाच्या विरोधात आहे.
३७० कलम हटवले तसे पी ओ के चे कलम करण्याची वेळ आली आहे.
जय भारत
ो ----------------------------------