आयपीएस बिरदेव डोणे यांची सर्वांना विनंती...

Kolhapur news
By -

            


            बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांनी सत्कार केला

           

       काेल्हापूर न्यूज नेटवर्क


भारतीय लोकसेवा आयोगाच्या  परीक्षेमध्ये ५५१ वी रँक मिळवणाऱ्या (आयपीएस) बिरदेव डोणे यांनी सर्वांना एक विनंती केली आहे, ते म्हणतात की... 


        आपल्या सर्वांचं प्रेम आणि सदिच्छा यांचा मनस्वी स्वीकार करताे .  मला भेटायला येणारे सर्वजण फुलांचे बुके घेऊन येत आहेत. माझ्या वाट्याला आज जी सत्काराची फुले आली त्याचं कारण सोबत असणारी पुस्तकं. ती आजही आहेत आणि यापुढेही राहतील. पुस्तकं हीच माझ्या आयुष्याची संजीवनी. त्यांच्या इतकं प्रामाणिक कोणीही नाही. म्हणून माझी सर्व बांधवांना विनंती आहे आपण मला पुष्प गुच्छ, शाल, श्रीफळ काही नाही आणलात तरी चालेल पण आपल्या आवडीच एक पुस्तक घेऊन या . ज्या गावात माझं शिक्षण झालं त्या गावात नवं वाचनालय उभं राहील ज्यातून वाहणाऱ्या आनंदाचा सुगंध हजारो विद्यार्थ्यांना प्रफुल्लित करेल. अन यातूनच भविष्यात माझ्या सारखे अनेक IAS / IPS बनतील. आपण देत असलेल्या पुस्तकाचा मनःपूर्वक आदर ....


------------------------------------------------