पहेलगाम येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी मुरगुड येथे कॅन्डल मार्च .

Kolhapur news
By -

      


         कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   काश्मीर मधील पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये २७ जणांना जीव गमवावा लागला .या घटनेचा निषेध करण्यासाठी मुरगूड शहरातील नागरिकांनी भव्य कॅण्डल मार्च काढला.काश्मीरमध्ये झालेला हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणारा आणि आतंकवाद पोसणाऱ्या  पाकिस्तानचा काळा चेहरा समोर आणणारा असा ठरला आहे.


    मुरगुड शहर नागरिकांनी शिवतीर्थ येथे कॅन्डल मार्च साठी जमण्याचे आवाहन केले होते .त्यानुसार संध्याकाळी सात वाजल्या  पासून नागरिकांनी जमण्यास सुरुवात केली . यानंतर कॅन्डल मार्चला सुरुवात झाली . बाजारपेठ, एसटी स्टँड मार्गे  हुतात्मा तुकाराम चौक येथे तो  आला. जनसमुदायासमोर ओंकार पोतदार, संकेत भोसले , बबन बारदेसकर,दगडू शेणवी, धोंडीराम मकानदार, अनिल सिद्धेश्वर इत्यादींनी नागरिकांच्या वतीने  तीव्र भावना व्यक्त केल्या. आतंकवाद पोसणाऱ्या  पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

"पाकिस्तान मुर्दाबाद.

आतंकवाद मुर्दाबाद."

   च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.रात्रीची वेळ असूनही तुकाराम चौकामध्ये मोठ्या संख्येने  उपस्थित राहून  मुरगूड वासियांनी निषेध मोर्चाला प्रतिसाद दिला. स्तब्ध राहून मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली .


  या मूक मोर्चा मध्ये सर्जेराव भाट, संतोष वंडकर संभाजी अंगज, दत्ता मंडलिक , एस व्ही चौगुले, तानाजी भराडे, विलास भारमल, जयसिंग भोसले, दिलीप कांबळे, सोमनाथ यरनाळकर, मयूर सावर्डेकर, बजरंग सोनुले, राजू भाट, धनंजय सूर्यवंशी, प्रफुल,कांबळे, संग्राम ढेरे, राहुल  शिंदे,अमर चौगुले रणजीत मोरबाळे,संकेत शहा, राजू शहा, प्रकाश पारिशवाड , सुभाष अनावकर,जगदीश गुरव दत्ता साळुंखे,प्रशांत सिद्धेश्वर, विक्रम गोधडे, गोधडे , अभी मिटके,संग्राम साळोखे उपस्थित होते. 






   -------------------------------------