तिरुपतीच्या धर्तीवर शिर्डी साई संस्थानची नवीन 'डोनेशन पॉलिसी' : १० हजारांची देगणी देणाऱ्या भक्तांना मिळणार 'व्हीआयपी' आरतीचा लाभ

Kolhapur news
By -

 

                    



   शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानने प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर देणगीदार भक्तांसाठी एक नवीन 'डोनेशन पॉलिसी' जाहीर केली आहे. या नव्या पॉलिसीनुसार आता कमी रकमेची देणगी देणाऱ्यांनाही विशेष सुविधा मिळणार आहेत. संस्थानकडून देणगीदारांच्या मागणीनुसार ही सुधारित योजना तयार करण्यात आली आहे.


याआधी 25 हजार रुपयांवरील देणगीदारांनाच साईबाबा मंदिरातील व्हीआयपी आरतीचा लाभ मिळत होता. मात्र, आता नव्या डोनेशन पॉलिसीत 25 हजारांची मर्यादा घटवली आहे. 25 हजारांची मर्यादा आता 10 हजार रुपये केली असून, यापुढे 10 हजार रुपये देणगी देणाऱ्या साई भक्तांना देखील व्हीआयपी आरतीचा लाभदेण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे.


10 ते 50 हजार देणगी देणाऱ्या भाविकाच्या कुटुंबातील पाच सदस्यांना एकवेळच्या आरतीचा लाभ मिळणार आहे.

       

             नवीन  डोनेशन पॉलिसी


50 हजार ते 1 लाख रुपये देणगी देणाऱ्या भाविकांसाठी दोन आरत्यांचा लाभ मिळेल.


1 लाख ते 10 लाख देणगी देणाऱ्या भाविकांना दोन आरत्यांचा लाभ तसेच आजीवन मात्र वर्षातून एकदा व्हीआयपी मोफत दर्शन मिळणार आहे.


10 लाख ते 15 लाख देणाऱ्या देणगीदारांसाठी वर्षातून दोन व्हीव्हीआयपी आरती तसेच पाच सदस्यांना आजीवन, मात्र वर्षातून एकदा व्हीआयपी दर्शनाची सुविधा मिळणार आहे.


50 लाख किंवा त्यापेक्षा पुढील देगणीसाठी तीन व्हीआयपी आरती व आजीवन मात्र वर्षातून दोनदा मोफत व्हीआयपी दर्शनाची सुविधा असणार आहे.


        ---------------------------