कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड लागू, तोकडे कपडे घालून येण्यास मनाई

Kolhapur news
By -

 

            


            कोल्हापूर न्यूज नेटवर्क


         कोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात तसेच ज्योतिबा मंदिरात बुधवारपासून पारंपरिक कपड्यांमध्येच प्रवेश करावा लागणार आहे. या दोन्ही मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मंदिर परिसरात येताना पारंपारिक कपडे किंवा पूर्ण अंग झाकले जाईल असेच कपडे घालून यावे लागणार आहे. या नियमांचे पालन उद्यापासून करावे लागणार आहे.


महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवांचे भाविकांना आवाहन


तोकडे कपडे घालून मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान समितीकडून सोवळ्याची देखील व्यवस्था केली जाणार आहे. याबाबत महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली आहे. आजच्या दिवस मंदिरात येणाऱ्या भाविकांना सूट देण्यात आली आहे. मात्र, उद्यापासून या नियमांचे कडक पालन करावे लागणार आहे, असे आवाहन शिवराज नाईकवाडे यांनी भाविकांना केले आहे.

            -----------------------