मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विराट कसोटीमधून निवृत्त होणार, अशी चर्चा होती. अशातच आता इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहली याने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या टेस्ट क्रिकेटच्या विराट पर्वाचा अंत झालाय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
यापूर्वी कोहलीने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, परंतु आयपीएल २०२५ मध्ये तो जबरदस्त फॉर्ममध्ये राहिला. त्याने आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये ५०५ धावा केल्या आहेत.
-------------------