समाजाला एकसंध ठेवणे ही माध्यमांची जबाबदारी - माजी मंत्री सतेज पाटील

Kolhapur news
By -

 

               



        कोल्हापूर न्यूज नेटवर्क


आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात काय खरे आणि  खोटे काय ? यावर विश्वास बसत नाही. या काळात विश्वासार्हता जपणारी पत्रकारिता होणे हे समाजाच्या हितासाठी आवश्यक आहे. चुकीची माहिती आणि अफवा पसरवण्याच्या या काळात समाजाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी माध्यम क्षेत्रावर असेल चुकीची माहीती पसरणाऱ्या या काळात समाजाला एकसंध ठेवणे ही माध्यमांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन माजी मंत्री सतेज पाटील यांनी केले  . 


  कोल्हापूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे संपादक अनंत दिक्षित आणि युवा पत्रकार मोहन मस्के यांच्या स्मृति जपण्यासाठी अनंत दीक्षित स्मृती समितीकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते  बोलत होते . खासदार शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार उल्हासदादा पवार  उपस्थित हाेते. 


यावेळी अनंत दिक्षीत स्मृती पुरस्काराने जेष्ठ संपादक कुमार केतकर आणि मोहन मस्के स्मृती पुरस्काराने युवा व्यंगचित्रकार अलोक निरंतर यांना गौरवण्यात आले.


यावेळी  ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, व्ही. बी. पाटील,स्वर्गीय अनंत दीक्षित स्मृती समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संपादक कुमार केतकर आणि पत्रकार मोहन मस्कर स्मृती पुरस्कार युवा व्यंगचित्रकार अलोक निरंतर यांना खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 


यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार, डॉ.वसंत भोसले, डॉ.श्रीराम पवार , निखिल पंडितराव  उदय नारकर, सुरेश शिरपूरकर, कॉ. सतीश कांबळे, व्यंकाप्पा भोसले,बबन रानगे तसेच समिती सदस्य विजय चोरमारे, डॉ.आदिनाथ चव्हाण, सम्राट फडणीस,विश्वास पाटील, धनंजय बिजले यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पत्रकार संपादक आणि सामाजिक क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.


   -----------------------------------------