भारत पाक शस्त्र संधी : भारतीय सेनेचा मोठा विजय .

Kolhapur news
By -

 

             


         कोल्हापूर न्यूज  /  वि .रा. भोसले


  भारत आणि पाकिस्तान यामध्ये शस्त्र संधी म्हणजेच युद्धविराम झाला आहे.

   भारतीय सेनेचा हा फार मोठा विजय आहे.

  पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) यांचा भारताच्या डी जी एम ओ ना फोन आला.

   हुश .....

आता थांबवा हे युद्ध.अमेरिकेचे अध्यक्ष

डोनाल्ड ट्रम्फ यांनीच त्यांना सांगितले असावे.

     भारताने लगेच मान्यता ही दिली आहे.

  एक मोठे कारण यामागे आहे.

  आजच 2 वाजता भारताने जाहीर केले होते.

 कोणतीही दहशतवादी कारवाई ही युद्ध समजली जाईल.

  पाकिस्तानला हे जणू शिरेतले इंजेक्शन दिले होते.

  मुंबई हल्ला,बालाकोट,पहेलगाम हे या व्याख्येत बरोबर बसले.येथेच पाकिस्तान हादरला.

     बापरे ,म्हणजे किरकोळ जखम केली तरी ३०२ कलम लागणार.

 येथेच पाकिस्ताने हाय खाल्ली. भारताने नुसती ही घोषणा केली नव्हती.तर डी जी एम ओ मार्फत जगाला सांगितले होते.

    सैन्याची तिन्ही दले तुटून पडली होती.जेथून हल्ले सुरू करायचे ते एअर बेसच भारताने उध्वस्त केले.अरब सागरातून विक्रांत वरून केलेल्या हल्ल्यात त्यांच्या नौदलाचे कंबरडेच मोडले होते.तसा पाकिस्तानला सागर किनारा कमीचआहे.कराची,रावळपिंडी,इस्लामाबद ,लाहोर,अशी मोठी शहरे जर हादरली तर राहिले काय ?

   

  असो ,जीवित हानी तरी टळेल.पाकिस्तानवर कितपत विश्वास ठेवायचा हे मात्र राजकीय चाणक्य ठरवतील.आपल्या सरकारकडे त्यांची कमतरता नाही.

    पाकिस्तानचे संरक्षण मंत्री,परराष्ट्र मंत्री एवढेच काय प्रधान मंत्री सुध्दा काय काय बरळले होते.


आमची अण्वस्त्रे काय सजावटीला ठेवली आहेत का ?

    आपल्याकडच्या एकाही मंत्र्याने एका शब्दाची सुद्धा प्रतिक्रिया दिली नव्हती.

   मौनात किती सामर्थ्य असते हे पाकने ओळखले असावे.

    आमच्या ब्राह्मोस ची क्षमता हजार किलोमीटरची आहे.

  पाकिस्तान ने खोटी बातमी पसरवली की आम्हीं ब्रह्मोसचे मोठे नुकसान केले.

आपल्या कर्नल सोफिया कुरेशी नी ती बातमी खोटी असल्याचे पत्रकारांना सांगितले.

 थोडक्यात पाकिस्तानी मंत्री आणि सेनाधिकारी भांबावून गेले होते .हादरले होते.

    त्यातूनच युद्धविराम साठी त्यांनी मागणी केली  आहे.

    भारतीय सेना,आणि राजकीय कुटनिटीचा हा विजय आहे.




 ----------------------------