नानीबाई चिखलीतील मुले मुली गिरवत आहेत शिवकालीन युद्धकलेतील लाठी काठीसह इतर कलांचे धडे

Kolhapur news
By -

             


       कोल्हापूर न्यूज नेटवर्क


             श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चिखली कागल विभाग यांच्यामार्फत शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण उन्हाळी शिबिरास  कुमार विद्यामंदिर चिखली येथे सुरूवात झाली आहे. पाच वर्षांपुढील मुला मुलींसाठी यामध्ये लाठी काठी,दांडपट्टा तलवारबाजी भाला स्वसंरक्षण, काठी लढत, आगीची काठी, भारतीय योगा याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे . प्रशिक्षण देणारी संस्था शांतीदूत मर्दानी आखाडा कोल्हापूरचे महेश कांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 


            या शिबिरासाठी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी  गोपाळ काटकर, राहुल गुरव, गणेश गोनुगडे  युवराज पाटील, योगीराज जंगम ,प्रितम सवळेकरी यांचे सहकार्य मिळत आहे . 


    ----------------------------------