कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मरगुबाई मंदिर परिसर, शिवतीर्थ, महालक्ष्मी उद्यान, बस स्थानक व नगरपरिषद परिसर येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शिवभक्तांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबवले. या पवित्र कार्यासाठी तब्बल तीन तास शिवभक्तांनी श्रमदान केले. या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर सफाई करण्यात आली असून नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
या उपक्रमात शिवभक्त सर्जेराव भाट, धनंजय सूर्यवंशी, तानाजी भराडे, अमर सुतार, अमोल मेटकर, प्रफुल्ल कांबळे, प्रकाश पारशवाड, शिवाजी चौगले, आनंदा रामाने व नगरपालिका कर्मचारी बबन बारदेसकर आणि इतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या स्वच्छता मोहिमेने परिसरातील नागरिकांना एक सकारात्मक संदेश दिला असून, सामाजिक भान जोपासत स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र स्तुतिसुमने उधळली जात आहेत.
---------------------