कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली येथील बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रविणदादा भोसले यांचे मार्गदर्शनाखाली चालु असलेल्या शिव-बसव सहकारी दुध व्यावसायिक संस्थेची सन 2024-2025 ते 2029-2030 करिता बिनविरोध निवडणूक झाली त्यानंतर आज चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड करण्यात आली.
यावेळी चेअरमनपदी सचिन गंगाधर सुर्यवंशी व व्हाईसचेअरमनपदी काशिनाथ अप्पासो चौगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी संस्थेचे नुतुन संचालक आदित्य धनाजी घाटगे, योगेश गजानन चौगुले,संदीप आप्पासो नुल्ले, प्रसाद प्रभाकर चौगुले, सचिन अनिल जंगम,संतोष विलास कांबळे,संचालिका सुजाता सुनील मगदूम व अश्विनी रामचंद्र चौगुले या सर्वांची बिनविरोध निवड झाली .
यावेळी प्रविणदादा भोसले यांनी सर्व संचालक मंडळाला शुभेच्छा देवुन संस्थेच्या सभासदांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी व शासकीय योजना सभासदांना देवुन संकलन वाढवुन संस्थेच्या प्रगतीसाठी लागले ती मदत करण्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी असेन.यानंतर अजित मगदुम यांनी आभार मानले.
--------------------------