कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मी आज कोल्हापुरी फेटा बांधून घेतला नाही. कारण माझा उजवा हात असलेला राजेश पाटील चंदगडमधून पराभूत झाला आहे. तुम्ही राजेश पाटील यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून द्या. तुम्ही म्हणाल तेवढे फेटे मी बांधून घेईन, अशा शब्दांत अजित पवारांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.
ते म्हणाले, मागील टर्ममध्ये आम्ही चंदगडसाठी तब्बल १६०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून अनेक विकास कामे उभी राहिली आहेत. तरीही तुम्हा राजेश पाटील यांना पराभूत केले. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे सर्वच सर्व उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, आमचे राजेश पाटील हेच निवडून आणले नाहीत, याचे मला खुप दुःख आहे.
-------------------------------