मुख्याध्यापकांनी माजी शाळे प्रति व्यक्त केली कृतज्ञता

Kolhapur news
By -

 

      


        कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   गेल्या एक दोन महिन्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर ,चिखली येथून मुख्याध्यापक पदावरती बढती होऊन विद्या मंदिर करनूर या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून रुजू झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर चिखली येथील  मुख्याध्यापक  अण्णा पाटील  यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर चिखली या शाळेच्या कायापालट करण्याच्या उपक्रमामध्ये उत्कृष्ट सहभाग घेतला .


बदली होऊन परगावी गेल्यानंतर सुद्धा त्यांनी शाळेविषयी आत्मीयता, आपुलकी जपली .ज्या शाळेमध्ये आपण अध्यापन केले शाळेच्या कायापालट उपक्रमामध्ये सहभागी झाल्यामुळे शाळेविषयी ऋणानुबंध निर्माण झाले होते. या शाळेविषयीच्या आपुलकीच्या  नात्याच्या प्रेमापोटी सरांनी शाळेची गरज ओळखून सुमारे  सहा हजार रुपये किमतीची शैक्षणिक कागदपत्रे ठेवण्यासाठी शाळेला गरजेची असलेली तिजोरी दान केली. 


याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती  व शाळा बचाव समितीने  त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली . 


     -------------------