४१ लाखाची लाच मागणारे उपजिल्हाधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Kolhapur news
By -

 

                   


           संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना लाच घेताना एसीबीने अटक केली आहे.


आरडीसींनी शेतजमिनीच्या कामासाठी 41 लाखांची मागणी केली होती. यातील 5 लाख रुपये घेताना एसीबीने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


  

 मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराला वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करायची होती. ती करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी तक्रारदाराकडे मोठ्या लाचेची मागणी केली होती. त्यांनी संबंधिताकडे सदरील काम करून देण्यासाठी 41 लाख रुपये मागितले होते. त्यातील 23 लाख रुपये संबधित तक्रारदाराकडून आधीच घेतले होते. मात्र, तरीही 18 लाखांची पुन्हा मागणी करण्यात आली. त्यातील 5 लाख रुपयांची लाच घेताना आरोपीला अटक करण्यात आली आहे.


            ------------------------------