अकाेला : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीबाबत अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय न झाल्यामुळे बच्चू कडू यांनी जूनपासून राज्यभर आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. 'डीसीएम टू सीएम' अशा नावाने हे आंदोलन राबवले जाणार असून, त्याची सुरुवात 2 जून रोजी बारामती येथून होणार आहे.
बच्चू कडू 2 जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर 'अर्थसंकल्प वाचन आंदोलन' करून त्यांना कर्जमाफीची आठवण करून देणार आहेत. बारामतीनंतर हे आंदोलन टप्प्याटप्प्याने पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. यात सर्वात शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर आंदोलन करणार असल्याची घोषण बच्चू कडू यांनी केली आहे.
---------------------------
----------------------