वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणा दरम्यान बहिस्थ परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी सवलत द्यावी :भरत रसाळे : SCERT चे संचालक राहुल रेखावार यांच्याकडे मागणी

Kolhapur news
By -

 

               


      कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणा दरम्यान बहिस्थ परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी सवलत द्यावी :भरत रसाळे : SCERT चे संचालक राहुल रेखावार  यांच्याकडे मागणी 

 कोल्हापूर :बाह्य बी ए . , एम ए अशा बहिस्थ परीक्षेस बसलेल्या शिक्षकांना दोन जून पासून सुरू होणाऱ्या  प्रशिक्षणादरम्यांन परीक्षा देण्यासाठी सवलत द्यावी .अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष भारत रसाळे यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद चे संचालक राहुल रेखावार यांचेकडे केले आहे .याबाबतचे निवेदन त्यांना ईमेल द्वारे दिले .


या निवेदनांत त्यांनी म्हंटले आहे की ,राज्यातील शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीसाठीचे प्रशिक्षण आपले संचालनालयामार्फत दि . 2 जून 2025 पासून सुरू आहे . याची वेळ सकाळी साडेनऊ पासून आहे .पण राज्यातील अनेक शिक्षक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ तसेच अन्य तत्सम विद्यापीठात बहिस्थ म्हणून बी .ए . / एम ए चे शिक्षण घेत आहेत .या उच्च अर्हताकारी शिक्षणाच्या परीक्षा पण 2 जून ते 20 जून दरम्यानच आहेत . त्यामुळे शैक्षणिक गुंता निर्माण झालेला आहे .या शिक्षकांची वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करण्यास कोणतीच हरकत नाही .तथापि त्यांचे उच्च अर्हताकारी शिक्षणाचे वर्ष वाया जाऊ नये अशी इच्छा आहे .


म्हणून आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करतो की ज्या दिवशी पेपर असतील त्या दिवशी संबंधित शिक्षकांना या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणातून अर्धा दिवस सवलत द्यावी व सदर दिवशीचा अभ्यासक्रम व मूल्यमापन जे असेल ते दुसऱ्या दिवशी पूर्ण करून घ्यावे अशी विनंती आहे . या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपण न्याय द्यावा अशी विनंती या निवेदनात केली आहे . 

   

                  --------------------