मुरगुड शहरातील मटण मार्केट बंद पडण्याच्या स्थितीत : शेडची दुरावस्था व स्वच्छतेचा अभाव

Kolhapur news
By -

 

                              


         कोल्हापूर न्यूज नेटवर्क

              

              जवळजवळ चार दशके सुरू असलेले मुरगूड मधील मटण मार्केट आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे.


   मार्केट मधील दहा गाळ्यांपैकी आता फक्त एखाद दुसरा गाळा सुरू असतो. पाण्याची व्यवस्था पण नाही त्यामुळे विक्रेत्यांना लांबून पाणी आणावे लागते. सर्वत्र अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य आहे.त्यामुळे ग्राहक नाके मुरडतात व बाहेरच्या बाहेर निघून जातात.मटण खरेदी साठी शहराच्या आसपास कांहीं ठेले आहेत तिकडे ग्राहक जात आहेत.तेथे कांहीं ठिकाणी रांगा लागतात. याचा परिणाम म्हणजे मुरगूड शहरातील मटण मार्केटची अत्यंत गरज असूनही ते आता अगदी बंद पडण्याच्या स्थितीत आहे.थोडक्यात मटण मार्केटची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.

    

येथीलच नागरिकांच्या वतीने एक निवेदन नगरपरिषेंदेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांना देण्यात आले आहे. नवीन इमारतीसह आवशक त्या सर्व सुविधा देऊन मार्केटचे पुनरुज्जीवन केल्यास नगरपरिषदेला सुद्धा कर रूपाने चांगले उत्पन्न मिळू शकेल व बाहेर जाणारा ग्राहक वर्ग शहरात थांबेल.निवेदनावर खालील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

   

  सर्जेराव भाट ,ओंकार पोतदार,अमर सणगर, प्रशांत हळदकर ,तानाजी भराडे, संदीप उर्फ गब्बर भारमल ,प्रशांत वंडकर, अजित मेंडके, दत्तात्रय नरवडेकर ,संकेत शहा प्रकाश पारिशवाड, संकेत भोसले ,प्रफुल कांबळे महेश खटांगळे, दिलीप बारदेस्कर ,संतोष तेली ,डी एस चौगुले ,अमर वड्ड इत्यादी.

             


              --------------------