कोल्हापूर न्यूज नेटवर्क
काल भाजप जिल्हा चिटणीस व संजय गांधी निराधार समिती सदस्य तानाजी कुरणे यांच्या अध्यक्षतेखाली बाळेघोल मधील शंभर पेक्षा अधिक सक्रिय कार्यकर्त्यानी समरजीतसिंह घाटगे गटातून भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
यामध्ये ग्रामपंचायत सदस्य रमेश विठ्ठल पोवार, तसेच पप्पूचंद पोवार, सुरज यादव, अनिल गावसकर, प्रवीण पोवार, वैभव डावरे, विशाल यादव यांच्यासह दूध संस्थांचे संचालक व हिंदुत्ववादी विचाराच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
या कार्यक्रमास कागल तालुका अध्यक्ष एकनाथ पाटील, मुरगूड मंडल अध्यक्ष ॲड अमर पाटील,भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मयूर सावर्डेकर, स्टार्ट अप इंडिया तालुकाध्यक्ष रोहन पाटील व युवा कार्यकर्ते आकाश पाटील हजर होते.
---------------------------