मुरगुडचे वैभव वाढवण्यासाठी सोलर लॅम्प बसवा : नागरिकांची मागणी.

Kolhapur news
By -

 

           


         कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        मुरगूडच्या वैभवात भर पडायची असेल तर शहरात जागोजागी सोलर लॅम्प बसवावेत अशी मागणी मुरगूडच्या अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी केली आहे.

    

 स्वच्छ प्रकाश आणि रमणीय वातावरण ही  शहरवासीयांची अपेक्षा असते.मुरगूड शहर कागलपेक्षा डिसेंट आहे असे इथे नोकरी व्यवसायासाठी येणाऱ्या बाहेरच्या लोकांनीही मान्य केले आहे.प्रशस्त बाजारपेठ , शिवतीर्थ,बसस्थानक, हुतात्मा तुकाराम चौक आणि पूर्वेचा विशाल जलाशय ही या सुंदरतेची वैशिष्ट्ये आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलर लॅम्प ची मागणी होत आहे.

  

आंबेडकर नगर,बाळूमामा कॉलनी,गुरव कॉलनी,राम मंगल कार्यालय,तुकाराम चौक,कापशी रोड,सावर्डेकर कॉलनी,मातंग वसाहत,डोंबारी वसाहत,महादेव गल्ली,माधव नगर,भोसले कॉलनी,सावकार कॉलनी,रोहिदास गल्ली,विठ्ठल मंदिर या ठिकाणी सोलर लॅम्प बसवण्यात यावेत असे निवेदनात म्हंटले आहे.

 

   तसेच सावर्डेकर कॉलनी,अंबाई कॉलनी,परिसरात अगदी कमि दाबाने पाणी पुरवठा होतो .त्यासाठी शासकीय विश्राम गृहाजवळ पाच लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधावी अशी ही मागणी करण्यात आली आहे.

    

 मुख्याधिकारी नगरपरिषद यांना दिलेल्या या निवेदनावर खालील नागरिकांच्या साह्या आहेत. 

  दत्तात्रय मंडलिक,मारुती कांबळे ,अभिजीत मीटके राजेंद्र पाटील,विनायक भूतल, ,भगवान लोकरे ,विवेक मंडलिक गोविंदा घुंगरेपाटील,संदीप वड,शुभम पाटील,विकी पाटील,रणजीत सावंत.


          -----------------------------