कोल्हापूर न्यूज नेटवर्क
तिकडे कलकत्त्याच्या ईडन गार्डन मैदानावर अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांनी लवकर आउट जाऊन देशभरातल्या क्रिकेट रसिकांची नाराजी ओढवून घेतली. रोहित शर्मा आणि विराट कोहली(रो को )हे पण रजेवर होते.हे सगळेच जणू त्याच दिवशी त्याच वेळेला म्हणजे एक मार्चला सायंकाळी मुरगुडच्या छोट्या क्रिकेट मैदानावर अवतरले असा जणू भास होत होता. त्यात किशोर वयाचा वैभव सूर्यवंशी पण असावा.
चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत शिंदेवाडी येथील शाहूनगर क्रिकेट संघाने स्वराज्य चषक पटकावला.क्रिकेट रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्यांच्या फटकेबाजीचे विवेचन ( कॉमेंट्री) सुद्धा तितक्याच जोशात केले जात होते.तिकडे संजू सॅमसंन ने सुद्धा विजयाच्या निम्म्या धावा चोपून वेस्ट इंडिजला धूळ चारली.आनंदी आनंद.
मुरगूड येथे भव्य असे क्रिकेटचे मैदानही नाही. मराठी शाळेच्या मैदानात हे सामने खेळले गेले. तेथे ना हिरवळ ना मोठे डिजिटल फलक.गल्ली तल्या चेंडूफळीचे रूपांतर या ग्रामीण मुलांनी तेज तर्रार क्रिकेट मध्ये केले.अपुऱ्या सुविधा असूनही तुरुणांनी भरवलेल्या कौतुकाच्या या स्पर्धांचे बक्षीस वितरण कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माजी खासदार युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या व गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीत सिंह पाटील यांच्या हस्ते झाले.
मुरगूड मध्ये भव्य क्रिकेट स्टेडियम असावे ही उणीव सुद्धा अधोरेखित झाली.स्वराज चषक स्पर्धेचे पहिले चार विजेते याप्रमाणे....
प्रथम क्रमांक: आर पी स्पोर्ट्स शाहूनगर.
द्वितीय क्रमांक : प्रतिभा स्पोर्ट्स बेलवळे.
तृतीय क्रमांक : इलेव्हन फायटर्स निढोरी.
चतुर्थ क्रमांक : संजय दादा वॉरियर्स बेनिक्रे.
मुरगूड च्या क्रिकेट मैदानावर अवतरले रोको. अभिषेक आणि वैभव सुद्धा.
स्वराज्य चषक शिंदेवाडी च्या शाहूनगर संघाने पटकावला.
स्वागत:नंदू चौगुले.
प्रास्ताविक : सुशांत मांगोरे
सूत्रसंचालन प्रा. अनिल पाटील
आभार : सर्वेश पोतदार.
प्रमुख उपस्थिती: देवानंद पाटील, बी एम पाटील, नामदेव भांदीगरे, रणजीत सूर्यवंशी, संतोष वंडकर, सुनील भावके, विजय गोधडे,रमेश वाईंगडे.
---------------------------------

