ते आले,त्यांनी पाहिले आणि फक्त प्रार्थना करून निघून गेले,भिडे गुरुजींनी बलिदान मास पाळणाऱ्या युवकांना नाराज केले : मुरगूड मध्ये नागरिकांत चर्चा.

Kolhapur news
By -

 

             

   

        



         कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


    शिवप्रतिष्ठिनाचे निर्माते बलिदान मास निमित्त मुरगूडला आले होते.मुलांनी शिवतीर्थवार त्यांच्या सभेचे आयोजन केले होते. प्रकाशव्यवस्था, ध्वनीक्षेपक, खुर्च्या अशी जय्यत तयारी  होती.भिडे गुरुजी आले आणि विराजमान होऊन त्यांनी सरळ माईक चा ताबा घेतला.बलिदान मास पाळणारे युवक, मुले, मुली,महिला यांनी परिसर खचाखच भरला होता. कोणा च्याही पायात चप्पल नव्हते. ते सगळे गुरुजींच्या समोर स्थानापन्न झाले. इतर अनेक नागरिक समोरच्या खुर्च्यावर बसले. नेहमी गजबजून असलेल्या शिवतीर्थ परिसरात सभा होती. गुरुजींचे शब्द ऐकायला सर्वच उत्सुक होते.गुरुजींनी माईक वरच विचारले. सभेला एखादे मंगल कार्यालय किंवा सभागृह मिळाले नाही काय? मूठभर लोकांच्या समोर मी काय बोलायचे.?


  वास्तविक श्रोत्यांची संख्या चांगली होती. गुरुजी मुलांना म्हणाले किमान पाचशे मुले गोळा करा म्हणजे मी पुन्हा येईन.मुलांनी विनंती केली पण गुरुजी निर्णयावर ठाम राहिले.प्रत्येकी किती श्रोते गोळा करणार असे विचारून कांहीचे फोन नंबर नावे घेतली.प्रार्थना करून ते थोडी चर्चा करून निघून गेले.रोमन साम्राज्याचा अजिंक्य सेनानी ज्युलियस सीझर याच्याबद्दल एक वाक्य प्रसिद्ध आहे.

He came. He saw He conquered.

तो आला, त्याने पाहिले, त्याने जिंकले.

.गुरुजी आले, त्यानी पाहिले पण मने न जिंकताच परत गेले.मुले नाराज झाली होती. श्रोते निराश झाले होते.श्रोत्यांची मने जिंकायला त्यांनी पुन्हा यावे अशी अपेक्षा शिव शंभो भक्तांनी केली आहे.


               -----------------------------