शिक्षण विभाग प्राथमिक, जि. प. कोल्हापूरच्या वतीने आयोजित प्रज्ञाशोध चाळणी परीक्षा ३५५ केंद्रावर संपन्न

Kolhapur news
By -

 

                        


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क  

 

शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने बॅ. बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध चाळणी परीक्षा ३५५ केंद्रावर घेण्यात आली.


जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग प्राथमिक यांचेमार्फत दि. १ मार्च रोजी बॅ. बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षा इ. ४ थी व ७ वी या वर्गांसाठी आयोजीत करणेत आली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इ. ४ थी आणि ७ वी साठी शिष्यवृती परीक्षा घेतली जाणार आहे. याच धर्तीवर प्रज्ञाशोध चाळणी परीक्षा जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग (प्राथमिक) यांचे मार्फत जिल्हयातील ३३५  केंद्रावर घेणेत आली. अशी माहिती प्रसिद्धीस  जिल्हा परिषद कोल्हापूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली.


 एकूण परीक्षा केंद्रसंख्या इयत्ता -४थी - १७६, इयत्ता - ७वी - १५९ एकूण - ३५५

एकूण विद्यार्थी पट संख्या 

इयत्ता ४ थी मराठी - २३८५१ ऊर्दू - ५१३

इयत्ता ७ वी मराठी - १३३०८ ऊर्दू - ४०२

एकूण - ३८०७४


एकूण हजर विद्यार्थी

 इयत्ता ४थी - मराठी - २२७१३ ऊर्दू - ४७०

इयत्ता ७वी मराठी - १२६ ४१ ऊर्दू - ३६१

एकूण हजर विद्यार्थी - ३६१८५ 


चाळणी परीक्षेतून तालुक्यातून गुणानुक्रमे मराठी माध्यमाचे इ. ४ थी चे 200 विद्यार्थी व ७ वी चे  १०० विद्यार्थी व उर्दू माध्यमाचे  १०० विद्यार्थी निवड परीक्षेसाठी पात्र होतील. उपरोक्त परीक्षा सुरळीत पार पाडण्याकरीता  ३५५ केंद्र संचालकांची नियुकती करणेत आली होती. परीक्षा कामकाज जिल्हयात सुरळीत होणेसाठी तालुका व जिल्हास्तरावरून गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रसंचालक व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.


  सदर परीक्षेकरीता कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील परीक्षा विभाग प्रमुख  रत्नप्रभा दबडे विस्तार अधिकारी (शिक्षण),  शशिकांत बडे, उपशिक्षणाधिकारी, आर. व्ही. कांबळे, आर. वाय. ठोकळ, विस्तार अधिकारी (शिक्षण)  डी.एच. पाटील, कनिष्ठ सहाय्यक तसेच प्रश्नपत्रिका निर्मिती कामकाज पाहणारे सर्व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने परीक्षा सुरळीत पार पडली.


           --------------------------