विज्ञानाची जीवनशैली आत्मसात करून देश बळकट करा - अविनाश चौगले : मुरगुड विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Kolhapur news
By -

 

          



            कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


विज्ञान म्हणजे निखळ सत्य असून विज्ञानाने शोधलेले सत्य सातत्याने निरीक्षण, गृहीतक आणि पडताळणीच्या कसोटीवर झळाळून निघते. विज्ञानातून सिद्ध झालेले तत्त्व मानवजातीच्या उद्धारासाठी उपयोगी पडते. त्यामुळे विज्ञान जगा, विज्ञानाची जीवनशैली आत्मसात करा, आपले जीवन घडवा आणि देश बळकट करा, असा मौलिक संदेश ज्येष्ठ विज्ञान शिक्षक व कोजिमाशीचे अध्यक्ष अविनाश चौगुले यांनी दिला.


 शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुरगुड विद्यालय ज्युनिअर कॉलेज येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. पी. पाटील होते. यावेळी प्रशालेच्या वतीने चौगले यांची कोजिमाशीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

विज्ञान दिनाच्या औचित्याने आयोजित विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. 



रसायनशास्त्राच्या प्रा.सुनीता स्वामी तसेच कु. शिवानी पाटील विजया मगदूम अक्षता खवरे श्रेया गुरव यांचे मनोगत झाले. नववीच्या विद्यार्थिनींनी विज्ञान गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.


कार्यक्रमास उपमुख्याध्यापक एस.बी. सूर्यवंशी,उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य विराजित घोरपडे, एम. डी. खाटांगळे, तंत्र विभाग प्रमुख पी. बी. लोकरे, सुपरवायझर एस. डी. साठे, प्रा. एस.एस.कोंडेकर, एस.डी.कुंभार आर जी पाटील, विज्ञान विभागाचे एन एन गुरव सुप्रिया बाईत,एन एम पाटील व्ही एस गुरव,व्ही एस सूर्यवंशी, उपस्थित होते.

सूत्रसंचालन एस.जे.गावडे यांनी केले, तर आभार ए. एम. कोळी यांनी मानले.


वैज्ञानिक आकृती रेखाटन स्पर्धा 


इयत्ता पाचवी अनुक्रमे 

 सुश्री विजय इंदलकर, कार्तिकी विनायक वागणे कर, स्वरांजली सागर खंडागळे,


 इयत्ता सहावी व इयत्ता सातवी 

 गुरव कस्तुरी नंदकुमार, पेडणेकर आयुष्य ऋषिकेश, शौर्य समीर कटके, व्यंकटेश संदीप पाटील, स्वरा पांडुरंग भोसले 


 इयत्ता आठवी नववी 

 दबडे यश शशिकांत, टेपूगडे अमृत मारुती, पुजारी संस्कृती संदीप, पाटील श्रेया बळवंत, कुंभार स्वरूपा सर्जेराव, रामाने स्वराली जयवंत 


        पेन्सिल आकृती रेखाटन

 इयत्ता आठवी नववी

 चौगले वेदिका विश्वनाथ 

 रावण ज्योतीराज प्रकाश, कांबळे वेदांत कृष्णात




            ----------------------------