कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शुक्रवारी गोकुळच्या नूतन अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया होणार आहे. गोकुळचा होणारा अध्यक्ष महायुतीचाच व्हायला पाहिजे असा मुंबईवरून निरोप आल्याचे समजते .त्यामुळे गुरुवारी पुन्हा एकदा गोकुळ मधील राजकारण चांगलेच रंगले.
जिल्हा बँकेमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के पी पाटील, संजयबाबा घाटगे यांची बैठक झाली. सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर हेसुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा चर्चेला सुरुवात झाली . या बैठकीत पुन्हा चर्चेला सुरुवात झाली. रात्री साडेसात वाजता बैठक संपली. या बैठकीत गोकुळच्या अध्यक्षपदासाठी नाव निश्चित झाल्याचे नेत्यांनी सांगितले. आम्ही सगळे एक दिलाने काम करत आहोत. नाव निश्चित झाले आहे , शुक्रवारी ते बंद पाकिटातून कळवले जाईल असेही नेत्यांनी स्पष्ट केले. मात्र या साऱ्या घडामोडीत गोकुळचा नवा अध्यक्ष कोण हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी होता. नेत्यांनी नाव निश्चित केले असले तरी नवीन अध्यक्षाबाबत सस्पेन्स कायम राहिला. गोकुळच्या राजकारणाने परत एकदा नव्याने वळण घेतले आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण ? सर्वसमावेशक चेहरा म्हणून शशिकांत पाटील यांना पसंती की अजित नरके, अंबरिश घाटगे, अमरसिंह पाटील, नाविद मुश्रीफ, अभिजीत तायशेट्टे यांना संधी दिली जाते याविषयी उत्कंठा वाढली.
----------------------