माधवी चौगले व संगीता कांबरे अहिल्यादेवी पुरस्काराने सन्मानित

Kolhapur news
By -

           


    कोल्हापूर न्यूज / हेरले प्रतिनिधी


        महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील माधवी चौगले व संगीता कांबरे या दोन महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आसल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच कस्तुरी पाटील यांनी दिली .

     

   महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने व ग्रामपंचायत मौजे वडगाव यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता महिला बचतगट, आरोग्य , साक्षरता , यासारख्या कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य करून महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. या कामाची दखल घेऊन त्यांना सरपंच कस्तुरी पाटील व उपसरपंच स्वप्नील चौगुले यांच्या हस्ते सन्मानपत्र , शाल, श्रीफळ , सन्मानचिन्ह , देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यावेळी माजी उपसरपंच रघूनाथ गोरड , ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे पाटील यांनी शासकीय माहिती देऊन मनोगत व्यक्त केले .

    

   यावेळी सरपंच कस्तुरी पाटील , उपसरपंच स्वप्नील चौगुले, ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे पाटील, माजी उपसरपंच व विद्यामान सदस्य सुनिल खारेपाटणे , सुरेश कांबरे , रघूनाथ गोरड , नितिन घोरपडे, सविता सावंत, सुनिता मोरे ,सुवर्णा सुतार , दिपाली तराळ, मधुमती चौगुले , माधूरी आकिवाटे , अविनाश पाटील, सचिन चौगुले , दगडू मोरे , आदी उपस्थित होते.


      ----------------------------------