कोल्हापूर न्यूज नेटवर्क
लाल परी म्हणजेच एस टी महामंडळाचा ७७ वा वर्धापन दिन मुरुगूड येथील एसटी बस स्थानकावर उत्साहात संपन्न झाला.
एस टी महामंडळाने स्त्रियांना ५० टक्के प्रवास सवलत दिली आहे.त्याशिवाय जेष्ठ नागरिक,अमृत प्रवास ,विद्यार्थी विद्यार्थिनी, दिव्यांग नागरिक, अशा अनेक सवलती प्रवाशांना दिल्या आहेत.प्रवासाच्या इतर अनेक सुविधा उपलब्ध असूनही माय भगिनी व अनेक प्रवासी एस टी लाच गर्दी करतात . पंढरपूर यात्रा ,रेणुका यात्रा, गणेश उत्सव , विद्यार्थी सहली यासारख्या सार्वजनिक सेवेसाठी एस टी नेहमी सज्ज असते. म्हणूनच प्रवाश्यांना एस टी आपुलकीची , जिव्हाळ्याची आणि आपल्या हक्काची वाटते . यामुळेच लाल परीला महाराष्ट्राची जीवन वाहिनी असेही म्हणतात. अशी मनोगते उपस्थितां मधून व्यक्त करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिक प्राचार्य व्हि आर भोसले यांच्या हस्ते वाढदिवस केक कापण्यात आला.शिक्षक बँकेचे व्यवस्थापक चव्हाण , पत्रकार राजू चव्हाण यांनी श्रीफळ अर्पण करून बसचे पूजन केले. व्यापारी पतसंस्थेचे संचालक प्रशांत शहा यांचे हस्ते गुलाब पुष्पें देऊन एस टी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रवाशांना साखर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी गारगोटी बस स्थानक प्रमुख जठार, सागर पाटील, वाहतूक नियंत्रक लिमकर, परीट, प्रा. भोई, शामराव शिंदे , अनेक प्रवासी नागरिक, विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासह इतर उपस्थित होते.