कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे नूतन चेअरमन म्हणून नाविद हसनसो मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर मुरगूड मधील मंडलीक गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
कागल तालुक्यात मंडलिक गटाचे स्वतंत्र अस्तित्व असून मध्यंतरी झालेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकी पासून मंडलिक गट व मुश्रीफ गटाने एकमेकांना मदत केली नाही अशा चर्चा होत होत्या .त्यामुळे कार्यकर्ते वेगळ्याच नजरेतून एकमेकांना पहात होते .प्रथमच नाविद मुश्रीफ हे गोकुळ दूध संघाचे चेअरमन झाल्यावर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज बापू पाटील उपस्थित होते .
नाविद मुश्रीफ हे महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र असून मंडलिक गट त्यांच्या पासून थोडा अलिप्त असावा असे चित्र दिसत होते.या अभिनंदन कार्यक्रमामुळे हा समज दूर झाल्याचे दिसत आहे.आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात बेरजेचे राजकारण महत्वाचे असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
यावेळी मंडलिक गटाचे प्रमुख कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, दत्तात्रय मंडलिक, एस व्ही चौगुले, दीपक शिदे, जयसिंग भोसले, सुहास खराडे, सर्जेराव पाटील, राजेंद्र भाट ,सचिन भारमल,राजेंद्र कांबळे शशिकांत पाटील, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.
-------------------