कोल्हापूर न्यूज नेटवर्क
लिंगनूर कापशी ता. कागल येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाले. कागल तालुक्यातील लिंगनूर कापशी येथील ग्रामस्थांची दिंडीप्रमुख कै. रामचंद्र ढेंगे दिंडी पंढरपूरला पायी वारी निघाली. यावेळी श्री. विठ्ठल पंथी दिंडी व श्री. दत्त पंथी भजनी मंडळ या दोन्ही भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या ग्रामस्थांच्या दिंडीमध्ये गळ्यात विना आणि टाळ घेऊन मंत्री श्री. मुश्रीफही सहभागी झाले.
टाळ मृदंगाच्या निनादात "विठोबा रखुमाई" च्या गजराने सारा गाव दुमदुमला. दिंडीत सहभागी वारकऱ्यांना मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने रेनकोटांचे वाटपही केले. कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील दिंडीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना २५ हजाराहून अधिक रेनकोट वाटप केले जाणार आहे.
यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक युवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, माजी सरपंच मयुर आवळेकर, ह. भ. प. शिवाजी पाटील, मधुकर नाना आवळेकर, एकनाथ कुंभार, बापूसो पाटील, सचिन आवळेकर, बाळासो आवळेकर, महादेव जाधव, मनोहर पवार, अण्णासो सासणे, नितीन मांगले, सागर पाडेकर, दत्तात्रय ढेंगे, सुनील चव्हाण, अण्णासो पाटील, शिवाजी पाटीलविठ्ठल मोरे, विठ्ठल पाटील, आप्पासो पाटील, दिनकर चव्हाण, आण्णाप्पा खतकर, सर्जेराव भोसले, सात्ताप्पा खतकर, सुमन कुराडे, वंदना पोवार, राजश्री कुंभार, विमल मडके, छाया ढेंगे, दिपक पोवार, तुकाराम कांबळे, मनोहर ढेंगे, बाळासो आमते, राजू ढेंगे, सुरेश चव्हाण या कार्यक्रमाला भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लिंगनूर कापशी ता. कागल येथे नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने दिंडीला जाणाऱ्या वारकऱ्यांना रेनकोटांचे वाटप करण्यात आले. यावेळी युवराज पाटील, नवीद मुश्रीफ, विकास पाटील, मयूर आवळेकर आदी प्रमुख.
-------------------------