कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड जवळील वेदगंगेवरील कुरणी धरण पाण्याखाली गेले आहे.पुलावर पाणी आले असून पाण्याचा दाब सुद्धा वाढत आहे असे समजते.
या पुलावरील सुरक्षा खांब सुद्धा मोडकळीस आले आहेत.या पुलाला पन्नास पेक्षा जास्त वर्षे झाली असून त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे.चार वेळा तक्रारी करून सुद्धा पाटबंधारे खात्याने म्हणावे तसे लक्ष दिले नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी तसेच कागलचे लोक प्रतिनिधी नाम.हसन मुश्रीफ यांना सुद्धा कार्यकर्त्यांनी माहिती दिली आहे.
लवकरात लवकर या ठिकाणी मोठे पूल तयार व्हावे अशी दहा गावच्या नागरिकांची मागणी आहे.जड ऊस वाहतूक , ट्रॅक वाहतूक ,दुचाकी , विद्यार्थी,विद्यार्थिनी ,अशी दिवसभर वाहतूक या पुलावर सुरू असते.
बानगे येथील पुलाप्रमाणे भक्कम पूल कुरणी धरणाच्या ठिकाणी तयार व्हावे अशी मागणी परिसरातून होत आहे.
----------------------------