कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचा यावर्षीचा जागतिक महिला दिन "बॅ . नाथ पै सेवांगंण मालवण "येथे दि ७ व ८ मार्च २०२६ रोजी साजरा करण्यात येत असून दि ७ मार्च ला सांय . ५ .३० वा महिला मेळावा आयोजित केला आहे .
या मेळाव्याचे उद्घघाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मा . जयप्रकाश परब यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख पाहुण्या म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ .मीना शेंडकर या लाभल्या आहेत . त्यांच्या शुभहस्ते समितीच्या कार्यकर्त्या सौ नंदिनी कोंडेकर संपादित ' स्वरकंठी ' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे हे असून या उद्घाटन समारंभ नंतर व्याख्यान , समूहनृत्य स्पर्धा व वैयक्तिक कलाभिनय व फनी गेम्स असे विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत .
रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी सकाळी समुद्रतट भटकंती नंतर जागतिक महिला दिनानिमित्त समितीच्या कोल्हापूर व कोकण विभागातील महिलांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . मीना शेंडकर यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून सर्व महिलांच्या वतीने त्यांना अभिवादन करणारा कार्यक्रम संपन्न होणार आहे .यावेळी डायट जिल्हा सिंधुदुर्गच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता सरिता कुदळे या उपस्थित राहणार आहेत . या कार्यकमाच्या समारोप प्रसंगी स्पर्धेतील विजेत्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे .
जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे संयोजन महिला जिल्हाध्यक्ष सविता गिरी , महासचिव सारिका पाटील शहराध्यक्ष चारुलता पाटील , विद्या पाटील ,वर्षा वायदंडे रोहिणी येडगे , सुनीता डावरे यांनी केले असून दोन दिवस चालणाऱ्या या जागतिक महिला दिन कार्यक्रमात कोल्हापूर व कोकण विभागातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सविता गिरी व शहराध्यक्षा चारुलता पाटील यांनी केले आहे .
--------------------------

