कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सर पिराजीराव तलाव मुरगूड शहराला पिण्याचे पाणी पुरवतो.या तलावास येऊन मिळणाऱ्या नाल्याची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वच्छता मोहीम येथील सेवाभावी स्वयंसेवकांनी हाती घेतली आहे.
नाल्यात प्लास्टिक कचरा, जुने कपडे, जुन्या मोटारींचे भाग,औषधाच्या व मद्याच्या बाटल्या,दप्तराच्या जुन्या बॅगा, मेलेल्या जनावरांची घाण . लाकडे अशा प्रकारचा कचरा अडकून पाणी अशुद्ध बनते . पाण्याचा प्रवाह त्यामुळे खंडित होतो. म्हणून पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचे हे काम करावे लागते .
विशेष म्हणजे समाज सेवेचे हे विधायक कार्य हाती घेणाऱ्या युवकांचे कौतुक करण्यात येत आहे.याच युवकांच्या मुळे शहरातील गांजा, गुटखा, सार्वजनिक ठिकाणचे मद्यपान या प्रवृत्तींना चांगलाच शह बसला आहे.विधायक कामांचे स्वराज संस्थांकडून सुध्दा स्वागत होत आहे.संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळींचे सुद्धा या युवकांनी लक्ष वेधून घेतले आहे.ही मोहीम साडे तीन तास सुरू राहिली.
सहभागी स्वयंसेवकांची नावे याप्रमाणे .सर्जेराव भाट,तानाजी भराडे,ओंकार पोतदार, जगदीश गुरव ,शिवाजी चौगुले,अमोल मेटकर, आनंदा रामाणे, प्रफुल्ल कांबळे,संकेत शहा.
******************