कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जिल्हाधिकारी,कोल्हापूर ,अमोल येडगे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक, कागल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.फारुक देसाई यांनी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत “निक्षय मित्र” होऊन क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी सहाय्य करावे असे आवाहन केले आहे.या आवाहनास प्रतिसाद म्हणून मुरगूड येथील उद्योजक जोतीराम गोपाळराव सूर्यवंशी यांनी दिलेल्या १० क्षयरुग्णांना दत्तक घेउन पोषण आहार कीटचे सहाय्य केले आहे.
यावेळी अशा "निक्षय मित्र” यांचा सत्कार मुरगुडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पोषण किटचे वाटप ग्रामीण रुग्णालय मुरगूड येथे करण्यात आले. डॉ. अमोल पाटील बोलताना म्हणाले की क्षयरोगाच्या उपचार कालावधीत औषधांबरोबरच योग्य पोषण आहार मिळाल्यामुळे रुग्ण औषधे मध्येच सोडत नाही व नियमित विनाखंड औषधोपचार घेतो.यामुळे रुग्ण वेळेत पूर्ण बरा होतो व रूग्णास पुढील टप्प्यातील क्षयरोग होत नाही. यासाठी क्षयरुग्णांना जास्तीत जास्त सकस आहार घेण्याची आवश्यकता आहे.
या वेळी आरोग्य निरीक्षक विजय कुंभार , एकनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले . सूत्रसंचालन पूनम कुंभार यांनी केले व आभार समुपदेशक श्री.राजेश गोधडे यांनी मानले.
या कार्यक्रमावेळी बहिर्जी पेट्रोलियम मुरगूड ,गडहिंग्लज व गोपाल एजन्सीज मुधाळ भडगाव चे सरपंच बी.एम.पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी घुमरे ,दंत चिकित्सक, डॉ.सचिन जिरगे, विनायक साठे ,अरूण कांबळे , गणपती पुजारी, स्वप्नाली परीट, राजेंद्र कुंभार, राजेश गोधडे , बाजीराव पाटील,श्रीम .सुरेखा कांबळे, टीबी सुपरवाझर गौरी खैरमोडे , रुपाली सासणे .विजय प्रधान ओंकार जाधव व ग्रामीण रुग्णालय मुरगूड मधील सर्व अधिकारी,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
--------------------