मुरगूड मध्ये कर्नाटकी बेंदूर जल्लोषात साजरा.प्रविणसिंह पाटील यांच्या कडे कर तोडण्याचा मान.

Kolhapur news
By -

 

            



        कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     मुरगूड तालुका कागल येथे कर्नाटकी बेंदूर जल्लोषात साजरा झाला. सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा कर तोडण्याचा कार्यक्रम उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. 

मुरगूड चे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या बैलाने यावर्षी सदर कर भर पावसात तोडली. कर तोडण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. दिग्विजय पाटील, 

सत्यजित पाटील यांच्या समवेत पाटील कुटुंबीयातील सर्व सदस्य मानकरी म्हणून यावेळी हजर होते.

  बैलपोळा सणानिमित्त यावर्षी प्रवीणसिंह पाटील यांच्या बैलाला कर तोडण्याचा मान होता .

कित्येक दशकापासून कै.विश्वनाथराव पाटील  व कै.विठ्ठलराव पाटील यांच्याकडे पाटीलकी असल्यामुळे  कर तोडण्याचा मान पाटील घराण्याकडे असतो. एक वर्ष विश्वनाथराव पाटील व एक वर्ष विठ्ठलराव पाटील  यांच्याकडे असलेला मान त्यांच्या पश्चात आज त्यांचे पुत्र प्रवीणसिंह पाटील व रविराज पाटील यांच्याकडे आहे .तो मान दोन्ही बंधू  आनंदाने स्वीकारतात.


आज दिवसभर यानिमित्त या बैलाला सजवण्यात आले होते. रंगवण्यात आले होते .फुगे बांधण्यात आले होते. गुलालाची उधळण करत फटाक्याची आतषबाजी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. अंबाबाई मंदिर येथे या बैलाचे पूजन करून कर पूर्ण करण्यासाठी सोडण्यात आले. त्यानंतर या बैलाने कर तोडली .हा क्षण पाहण्यासाठी मुरगूडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते




            ********************