प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन टोचून जीवन संपवलं आहे. न्यू तापडिया नगरमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले आहे. डॉ. जावरकर हे अकोल्यातील ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांच्या ‘सन्मित्र हॉस्पिटल’मध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत होते. तणाव, नैराश्य आणि मानसिक आजारांनी त्रस्त रुग्णांना समुपदेशन करून मदत करणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःच जीवन संपवल्याची घटना सुन्न करणारी ठरली आहे. विषारी इंजेक्शन टोचून जीवन संपवलं या घटनेमुळे संपूर्ण अकोला शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नेहमी सकारात्मक विचार मांडणारे, पेशंटच्या समस्या समजून घेऊन त्यांना मानसिक आधार देणारे डॉ. जावरकर स्वतःच इतक्या मोठ्या तणावाखाली होते का, हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे .
-----------------------------