मुरगूड मध्ये ब्रम्हा कुमारी विश्वविद्यालयामार्फत जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा.सर्व स्तरातील महिलांचा सत्कार.

Kolhapur news
By -

 

           




            कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


मुरगूड येथील ब्रम्हा कुमारी विश्वविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे समाजातील सर्व स्तरातील महिलांचा यावेळी भेट वस्तू व  प्रतिकात्मक ईश्वरीय संदेश देऊन सन्मान करण्यात आला.


   विद्यालयाच्या मुख्य संचालिका लता बहेनजी म्हणाल्या की स्त्री मध्ये ईश्वरीय शक्ती वास करत असते. तिच्या मध्ये समर्पण भाव असल्याने समाजाला एक प्रकारचे स्थैर्य व सामर्थ्य प्राप्त होते.


     मुरगूड, चिमगाव, निढोरी, कुरणी, यमगे या व अन्य ठिकाणच्या समाजातील शैक्षणिक, औद्योगिक,वैद्यकीय,व्यापार आणि कष्टकरी अशा सर्व क्षेत्रातील  महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महिला दिनाचे महत्व ही बहेनजींनी समजावून सांगितले. एक काळ असा होता की पुरुष प्रधान राज्य व्यवस्थेत स्त्रियांना मतदानाचा सुद्धा अधिकार नव्हता.सामाजिक सन्मान नव्हता. उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता.आज महिलांना आत्मविश्वास, आत्मचिंतन, आत्मसन्मान याची जाणीव झाली आहे. आत्म शुद्धी साठी त्यांनी परमात्मा चिंतन सुद्धा केले पाहिजे असा संदेश विद्यालय संचलिका लता दीदींनी दिला. समारंभास नव्वद हून अधिक महिला उपस्थित  होत्या.या समारंभाचे स्वागत व सूत्रसंचालन लक्ष्मीबहेन यांनी केले.विद्यालयाच्या साधकांनी आयोजनात सर्व सहकार्य केले.

       


              ------------------------------