जागतिक महिला दिनी मुरगूडच्या महिलांनी आपापल्या कॉलनी त साजरा केला होळीचा रंगोत्सव.

Kolhapur news
By -

 

      





     कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


        जागतिक महिला दिनी   मुरगूडच्या महिलांनी आपापल्या कॉलनी त साजरा केला होळीचा रंगोत्सव.आठ मार्च हा महिला दिन. त्याच दिवशी महाराष्ट्रात होळीचा ररंगोत्सव रंगपंचमी म्हणुन साजरा केला जातो. नमहिलादिना दिवशीच रंगपंचमी आल्याने महिलांच्या उत्साहाला उधाण आले.होळी गीतांच्या दमदार चालीवर आणि वाद्यांच्या तालावर मुरगूड मधील विविध कॉलनीतील  महिलांनी रंगोत्सव साजरा केला.

   होली है बुरा न मानो चा नारा देत एकमेकींच्या अंगावर रंगांची उधळण करण्यात आली. शाळकरी आणि महाविद्यालयीन मुली सुद्धा सामील झाल्या. चूल आणि मूल तर नेहमीचेच आहे पण महिला दिन वर्षातून एकदाच येतो. त्यातही रंग पंचमी दिवशी तो आल्याने दुधात साखर असा योग आला होता.असे म्हणून अनेक  गृहिणी सुद्धा सामील झाल्या.


     महिला दिन म्हणजे महिलांनी स्वतःचा आत्मविश्वास, आत्मसन्मान जागविण्याचा व महिला सबलीकरणा साठी आवश्यक असलेल्या आत्मचिंतनाचा दिवस आहे.जागतिक महिला दिनाची हीच उद्दिष्टे ठेऊन तो जगभर साजरा केला जातो. मध्यपूर्वेत युद्धाचे गडद  सावट असूनही महिला दिन तेजोमय करण्याचा ध्यास जागतिक महिला संघटनेने घेतला आहे.


   याची जाणीव भारतीय महिलांना आहेच. शिवाय ते लोण ग्रामीण भागात सुद्धा पसरले आहे याचा प्रत्यय मुरगूड मधील महिलांच्या रंगॊत्सवात सुद्धा आला. सकाळी आठ ते दुपारी साडेबारापर्यंत विविध उपनगरात हा रंगोत्सव सुरु होता.नागरिकांनी सुद्धा त्यांच्या या आनंदोत्सवास शुभेच्छा दिल्या.

         


             ----------------------------