https://www.kolhapurnews5.com/2026/03/20.html
(६ मार्च २०२६ च्या बातमीची लिंक)
कोल्हापूर न्यूज नेटवर्क
दोन दिवसापूर्वी म्हणजे ६ मार्च २०२६ च्या बातमीमध्ये "कोल्हापूर न्युज" ने सूर्याचा संघ टी 20 वर्ल्ड कप जिंकणार असे म्हंटले होते.ते भविष्य नव्हते. तर सूर्याच्या संघाचा आत्मविश्वास आणि श्रद्धा यांच्या जोरावर हा सामना जिंकणार असे म्हटले होते.
हसरा बुमराह तर चमकला. त्याने चार विकेट घेतले. कॉमेंट्रेटर ने बूम बूम बुमराह म्हणून त्यांची प्रशंसा केली. कमालीचा बोलर.
मागच्या काही सामान्यात गोधळलेल्या अभिषेक ने 18 चेंडूत अर्ध शतक काढून भारतीय संघाला धावांचा अभिषेक केला.
देखण्या ईशान किशनने तर कमाल केली.मैदानात जणू कृष्ण (किशन) अवतरला होता.तीन अप्रतिम झेल. तीन वेळा न्युझिलंडची हंडी फोडली.तिरंगा पांघरून तो मैदानात नाचला.
संजू च्या दमदार खेळाने चौथ्यांदा क्रिकेट रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्याला कदाचित मॅन ऑफ सिरीज अवॉर्ड मिळेल सुद्धा.
सूर्या आज झिरोवर गेला पण कप्तानीत हिरो ठरला.नरेंद्र मोदी मैदानाची माती त्याने कपाळी लावली
भारतीय संघाच्या या विजयाचे कोट्यावधी रसिक प्रचंड जल्लोषात स्वागत करतील.
2007 पासून तीन वेळा भारताने टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे.
क्रिकेटचे ते वाक्य प्रसिद्ध आहे.
CRICKET IS A GAME OF CHANCE.
आत्मविश्वास, जिद्द आणि खेळावरील श्रद्धा यांच्या जोरावर सूर्याच्या संघाने हा चान्स सहज घेतलाआहे.न्युझिलंडच्या संघाला अखेर नमवले आहे.
जय भारत.
----------------
अहमदाबाद : भारताने टी-२० विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. अहमदाबादमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ बाद २५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड १५९ धावांवर सर्वबाद झाला.
भारताच्या विजयाने तीन मोठे विक्रम रचले आहेत. टीम इंडियाने विश्वचषक अंतिम सामन्यात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम रचला आहे. टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यात भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे, तर न्यूझीलंडचा सर्वात मोठा पराभव आहे.
( फोटोच्या वर ६ मार्च २०२६ च्या बातमीची लिंक आहे आणि खाली बातमीचे दाेन स्क्रीन शॉट दिले आहेत)
------------------------------------------------
----------------------------------------