कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हमीदवाडा साखर कारखान्याच्या दहा वर्षे संचालिका म्हणून कार्य केलेल्या कै. अनुराधा रावसाहेब भोसले यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त नानीबाई चिखली येथे त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. विजयसिंह भोसले यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवर, ग्रामस्थांनी त्यांना आदरांजली वाहिली.
कै. अनुराधा भोसले यांनी सामाजिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. हमीदवाडा साखर कारखान्याच्या संचालिका म्हणून त्यांनी दहा वर्षे प्रभावी काम करत शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची आठवण उपस्थितांनी यावेळी जागवली.स्मृतिदिन कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. समाजकारणातील त्यांची तळमळ, सर्वसामान्यांशी असलेला जिव्हाळा आणि सहकार क्षेत्रातील योगदान याबद्दल उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कै .अनुराधा रावसाहेब भोसले दूध संस्थेमध्ये झालेल्या कार्यक्रमात विजयसिंह रावसाहेब भोसले, खडकेवाडाचे उदयसिंह घोरपडे काका, युवराज जाधव , सरपंच युवराज कुंभार, राजाराम देवडकर, नंदकुमार चाबुकस्वार, विवेक चाबुकस्वार, शशिकांत मगदूम, राजाराम लोकरे, अजित पिसाळ, विजय घस्ती , भाऊसाहेब कुंभार, बाबासो आरगे, बाळासो मुरगुडे, अनिल घाटगे,जोतिराम वाडकर, जयकुमार शिंदे, ऋषिकेश कालेकर, संदीप लोकरे, टील्ल्या गुरव व इतर मान्यवर उपस्थित होते.
-------------------------


