वल्लभभाई पटेल यांच्या सारखी धडाडी अमित शहा नी दाखवली. पालक मंत्र्यांचे भाषण व्हायरल.

Kolhapur news
By -

 



                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक दिवसाचा कोल्हापूर दौरा नुकताच संपन्न झाला. त्यांच्या या दौऱ्याचा मुख्य उद्देश करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे भक्ती भावे दर्शन आणि दीड किलो चा अकरा फूट उंचीचा सोन्याचा कळस अर्पण करणाऱ्या दानशूरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे.


     कोल्हापूर ही त्याची सासरवाडी. त्यांच्या पत्नी पद्माराजे गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थिनी.श्री महा लक्ष्मीचे सानिध्य आणि वरदहस्त अगदी त्यांच्या लहानपणापासूनच त्यांना लाभले. पती भारताचे गृहमंत्री. त्यांच्या एका शब्दावर मंदिर सोन्याने झळाळले गेले तर त्यात तर नवल ते कसले.!


     हे एक निमित्त असले तरी त्यांचा दौरा गाजला तो पालक  मंत्र्यांच्या स्वागतपर भाषणाने.


    अमित शहा यांच्या धडाडीची तुलना त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याशी केली. टाळ्यांचा गजर झाला.त्यांचे भाषण अत्यंत ओघवते होते. उंच कड्यावरून कोसळणऱ्या संथ शुभ्र जलधारे प्रमाणे त्यांचे  वक्तृत्व टाळ्या घेत होते. सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या कार्याशी त्यांनी केलेली अमित भाईंच्या कार्याची तुलना  विरोधकांच्या भुवया उंचावयाला लावणारी असली तरी त्यात निश्चित तथ्य होते.


    वल्लभभाईंच्या कार्याचा आढावा घेऊ म्हणजे हे लक्षात येईल. वल्लभभाईंचा बाराडोली चा शेतकरी सत्याग्रह पाहून महात्मा गांधीच काय पण ब्रिटिश सरकार सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. एक हाक आणि हजारो शेतकरी भाकरी बांधून तयार. 


स्वातंत्र्यानंतर ते उपपंतप्रधान व गृहमंत्री बनले. देशातील 560 संस्थाने भारतीय संघराज्यात त्यांनी विलीन करून घेतली. ब्रिटिशांसमोर मांजरासारखा म्यावं असलेला हैद्राबादचा निजाम व जुनागढचा नबाब यांना त्यांनी जणू चाबूकच काढला.लष्करी कारवाई करून त्यांना संघराज्यात सामील केले.


    काश्मीरच्या 370 कलमा ला सरदार पटेल व डॉ. आंबेडकर या दोघांचा सक्त विरोध होता.नेहरू अमेरिकेतून आल्यानंतर शेख अब्दुल्लाच्या दबावाने नेहरूनी ते घुसडले. सन 1950 ला सरदार पटेल व 1956 ला  डॉ.आंबेडकर यांचे निधन झाले. दरम्यान हजारो काश्मिरी पंडितांची कत्तल झाली. त्यांना काश्मिरातून हाकलून लावले गेले.नंदनवन रक्तरंजित झाले.


    2014 ला मोदी सत्तेवर आले. अमित शहा गृहमंत्री झाले. 2019 ला त्यांनी काश्मीरमधील 370 कलम लष्करी कारवाईने हटवले.श्रीनगरच्या ज्या लाल चौकात तिरंगा पायाखाली तुडवला गेला होता व त्यावर गॊहत्या करण्यात आली होती तेथे आज तिरंगा डौलाने फडकत आहे.72 वर्षे नंदनवन जळत होते.तो दाह कमी झाला.


     इकडे देशभर मावोवादी नक्षलवादी धुमाकूळ घालत होते. जंगलात राहून ते पोलिसांवर हल्ले करायचे. डाव्या विचारांचे तथाकथित शहरी विचारवंत त्यांना साथ द्यायचे. अमित शहानी कठोर कारवाई करून जंगली आणि शहरी नक्षलवाद पूर्ण संपवून टाकला.  शस्त्रे खाली ठेऊन ते शरण आले.


    पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या ओघवत्या भाषणाला केवळ टाळ्याच मिळाल्या नाहीत तर राष्ट्राच्या ह्रदयातील या काळ्या आठवणी सुद्धा जाग्या झाल्या.


       प्रकाशजी एवढ्यावर थांबले नाहीत. कोल्हापूरच्या जावयांना जिल्ह्याच्या विकास योजना साठी आर्थिक मदत करण्यासाठी आवाहनही केले.जिल्ह्याला एक सार्थ पालक मंत्री मिळाला हे सिद्ध करण्यात ते यशस्वी झाले असे मानायला हरकत नाही. त्यांच्या भाषणाने अमित शहांचा दौरा खऱ्या अर्थाने गाजला असे ही मानायला काय हरकत नाही.   

    पालक मंत्र्यांचे भाषण सोशल मीडियावर खुप व्हायरल होण्याने शहांचा दौरा गाजला असे वाटते.


           पालकमंत्री भाषण व्हिडिओ


               -------------------------