कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सन २०२५-२६ मध्ये झालेल्या इयत्ता ११ वी मध्ये प्रवेशित झालेले विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात येणा-या संगणकीय प्रणालीवर खालील प्रमाणे बदल करण्यात यावेत.
इयत्ता ११ वी मधून इयत्ता १२ वी मध्ये प्रवेश घेताना माध्यम, विषय आिण शाखा बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.इयत्ता ११ वी मधून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेताना माध्यम, विषय आणि शाखा बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
राज्य मंडळा व्यतीरिक्त इतर मंडळातून प्रवेश, परराज्यातून येणा-या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या प्रवेश प्रक्रियेत प्रवेश निश्चित करावयाचा असल्यास इयत्ता १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ११ वी मध्ये आणि इयत्ता ११ वी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी मध्ये राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याकरीता सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक २७/०४/२०२६ रोजीचा शासन निर्णयामध्ये नमूद १४.८ व १८ नुसार पालकांची बदली झाल्यास शासनाच्या बदली आदेशाप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालय बदलण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
या व्यतिरिक्त काही अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास अशा विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय बदल करावयाचा असल्यास ठोस पुरव्यानिशी विभागीय शिक्षण उपसंचालक संचालनालयास प्रस्ताव सादर करतील. विद्यार्थी अपवादात्मक परिस्थितीत कनिष्ठ महाविद्यालय बदलविण्याचा ऑनलाईन अर्ज शिकत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातून करतील त्यावेळी पुरावे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
वरील प्रमाणे बदल करावयाचा ऑनलाईन प्रस्ताव भरताना प्रत्येकवेळी प्रत्येक विद्यार्थ्याने बदलाचे कारण नमूद करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
वरील प्रमाणे बदला करीता इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर दिनांक २२/०६/२०२६ रोजी सकाळी १०.०० वा. पासून सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच उपरोक्त प्रक्रिया सुलभपणे होण्यासाठी विद्यार्थी मार्गदर्शक सूचना प्रवेश प्रक्रियेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत. अशी माहिती पत्रकाद्वारे प्रसिध्दीस सहाय्यक शिक्षण संचालक डॉ.गणपती कमळकर यांनी दिली आहे.
---------------------

