नानीबाई चिखलीचे सब लेफ्टनंट सुयश नुल्ले कागल तालुक्याचा अभिमान : गावाचे नाव देश पातळीवर नेतील - समरजित घाटगे

Kolhapur news
By -

  

             



                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  नानीबाई चिखलीचे सुपुत्र सुयश राजेंद्र  नुल्ले याने भारतीय सैन्य दलात सब लेफ्टनंट पदापर्यंत मजल मारून गावाचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे भविष्यात ही गावाचे नाव देशपातळीवर नेतील. त्यांचा हा सन्मान नुल्ले कुटुंबाबरोबरच संपूर्ण कागल तालुक्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले. 


नानीबाई चिखलीचे  सुपुत्र सुयश राजेंद्र नुल्ले यांची इंडियन नेव्ही मध्ये सब लेफ्टनंट (कमिशनपदी) निवड झालेबद्दल ग्रामपंचायत, ग्रामस्थ तसेच गावातील आजी-माजी सैनिकांच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात  अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते .


      सब लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल सुयश नुल्ले, पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल दीपक तुकान, कर सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल करीम जमादार, मुंबई पोलीस पदावर निवड झालेले ओंकार गुरव ,  जीएसटी मध्ये नियुक्त झालेल्या नाजमिना नाईक यांचा सत्कार यावेळी समरजित घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. सुयश नुल्ले यांनी आपल्या  मनोगता मधून  आज पर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला . प्रवीणदादा भोसले यांचे यावेळी भाषण झाले. 


         या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या शिवानी विजयसिंह भोसले, बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणदादा भोसले, कोल्हापूरच्या पिराजीराव घाटगे शारीरिक शिक्षण धर्मादाय न्यासचे  विश्वस्त विरेंद्रसिंह प्रविणसिंह घाटगे , निवृत्त कॅप्टन  बाबासाहेब पाटील (इंडियन नेव्ही) ,निवृत्त कर्नल  माधव वेसवीकर,  निवृत्त कॅप्टन  पी.डी. घोरपडे (इंडियन नेव्ही) ,  निवृत्त कर्नल  शिवाजीराव बाबर, कॅप्टन रोहित कामत , श्रीनाथ उद्योग समूहाचे चंद्रकांत गवळी , चिखलीतील आजी-माजी सैनिक संघटनेचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. 


                     --------------------------