मुरगूडमध्ये स्मार्ट मीटरविरुद्ध महावितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा ! स्मार्ट मीटर जोडणी थांबवा अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा !

Kolhapur news
By -

 


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क 

   

 मुरगूड शहर व परिसरात सध्या वीज महावितरण कंपनीकडून छुप्या पद्धतीने स्वार्टमीटर बसविण्याची मोहिम सुरु आहे यास तीव्र विरोध करीत वीजग्राहकांकडून मुरगूड विभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला .


         हुतात्मा तुकाराम चौकातून हा मोर्चा वीज कंपनीच्या  विभागीय कार्यालयावर आला यावेळी मोर्चातील सहभागींनी स्मार्ट मीटर बसवू नका ! अशा फलकांनी लक्ष वेधले व सक्तीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली .


         वीज कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी सहाय्यक अभियंता श्रीमती मार्गशीर्षा चौगले व सुरेश कोकणे यांना चांगलेच धारेवर धरले आणि प्रश्नांचा भडीमार केला .


         वीजग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नका सक्ती करू नका . जुने मीटरच पूर्ववत बसवावे . स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकावर लादण्याचा अगर दमदाटीचा प्रकार खपवून घेणार  नाही अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले .


      मोर्चामध्ये प्रामुख्याने कॉ बबन बारदेस्कर  बिल एस खामकर,समाधान हेंदळकर शाहू फर्नांडीस,दगडू शेणवी ,प्रदीप वर्णे ,मारुती पुरीबुवा ,दिग्वीजय पाटील, विलास गुरव , प्रल्हाद कांबळे ,सिकंदर जमादार आदीसह शकडो वीज ग्राहक सहभागी झाले होते. 


          ----------------------------------