कोल्हापूर न्यूज नेटवर्क
रमजान ईद आणि बलिदान मास यांच्या पार्श्वभूमीवर मुरगूड मध्ये पीएसआय शिवाजी करे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे संचलन काढण्यात आले. संचलानात अग्निशामक दल व अंब्युलन्स यांचा सुद्धा समावेश होता.
मुरगूड शहरात 40 दिवसांचा बलिदान मास सुरु आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी तुळापूर येथे केलेले बलिदान हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने महाराष्ट्रभर विविध शहरांत व ग्रामीण भागात बलिदान मास पाळण्यात येतो. या मध्ये शेकडो महिला पुरुष शाळकरी मुलामुलींचा सुद्धा समावेश असतो.
धार्मिक भावनेने एखाद्या व्रता सारखा हा मास पाळला जातो. पायात चप्पल बूट न घालता अगदी अनवाणी चालायचे व मांसाहार पूर्ण वर्ज्य करायचा ही या व्रताची वैशिष्ट्ये आहेत. या मासात विविध सांप्रदायिक व वैचारिक कार्यक्रम सुद्धा घेतले जातात.
याच दरम्यान मुस्लिम बांधवांचे रमजान महिन्याचे उपवास व धार्मिक उपक्रम सुरु आहेत. हिंदूं बांधवांचा पारंपरिक रंगपंचमी चा सण सुद्धा रविवारी आहे.
कोणतेही सांप्रदायिक अनुचित प्रकार घडू नयेत व सर्वांनी कायदा व सुव्यव्यवस्था ( Law and Order ) यांचे पालन व्हावे यासाठी सर्व नागरिकांना पोलीस संचलानातून सहकार्याचे आवाहन करण्यात आले.
संचलनाचा मार्ग शिवतीर्थ, बस स्थानक, हुतात्मा तुकाराम चौक, गावभाग, अंबाबाई मंदिर, गावतलाव , विठ्ठलराव पाटील नगर, बाजार पेठ असा होता.
--------------------------------

